अहमदनगर: अल्पवयीन मुलीला वर्षभर धमकी देत अत्याचार
Ahmednagar | Shrirampur Crime News: अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्या घरी जाऊन वर्षभर अत्याचार (Sexually abused) केल्याची धक्कादायक.
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातून अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्या घरी जाऊन वर्षभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या घरी जावून तिला व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देवून एक वर्षभरापासून अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील या अल्पवयीन मुलीच्या घरासमोर पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे हा येता जाता थांबत असे. अशीच ओळख होवून तो घरी येवू लागला. काही दिवसांनी अल्पवयीन मुलीचे आई व भाऊ दोघेही कामावर गेल्यानंतर तिस दमदाटी करुन तिला धमकी देवून तिच्यावर अत्याचार करत राहिला. एक वर्षभर त्याने तिच्यावर अत्याचार केल्यामुळे तिला दिवस गेले. मात्र एक दिवस त्याने धमकी देवून तिचा गर्भपात केला. या त्रासाला कंटाळून ती दोन ते तीन महिने गावी निघुन गेली. मात्र श्रीरामपुरातील मुल्ला कटरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याचे समजताच तिने धैर्य राखून तिने पोलीस ठाण्यात जाण्याचे ठरविले.
दि. 26 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात येवून तिचे फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे याचे विरुध्द भादंवि कलम 376 (2), (जे), (एन) अल्पवयीन मुलांचे संरक्षण कायदा कलम 3, 4, 5 (जे) (2) (6) अन्वये (Rape) गुन्हा (Crime) दाखल केला आहे.
Web Title: minor girl was abused and threatened for a year