Home Ahmednagar Live News अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार

minor girl was lured away and sexually abused

श्रीरामपूर:  बेलापूर येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी  एका जणाविरोधात  श्रीरामपूर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बेलापूर येथील आरोपीस अटक केली आहे..

बेलापूर-ऐनतपूर येथील एका अल्पवयीन मुलीस असलम मंजुर शेख याने आठ दिवसांपूर्वी फूस लावून पळवून नेले होते.  याबाबत बेलापूर पोलिसांनी भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर मुलगी ही देहरे येथे असल्याचे समजताच पोलीस त्याठिकाणी पोहोचले. नातेवाईकांनी त्या मुलीस पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी पळवून नेणारा असलम शेख यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार पोस्को (sexually abused)आदी वाढीव कलम लावण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, रामेश्वर ढोकणे, निखील तमनर, पोपट भोईटे, हरिष पानसंबळ यांनी त्या मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास  तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील व हवालदार लोटके करीत आहेत.दरम्यान बेलापुरात याअगोदर चार महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. 

Web Title: minor girl was lured away and sexually abused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here