Home Suicide News एसटी कर्मचाऱ्याने केले विष प्राशन

एसटी कर्मचाऱ्याने केले विष प्राशन

ST employee poisoned trying to suicide

शेवगाव | Shevgaon: एसटी कर्मचारी संप सुरु आहे. यातच शेवगाव आगारातील एका कर्मचाऱ्याने विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. कर्मचाऱ्याची प्रकृती खालाविल्याने त्याला  नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारयानी संप पुकारलेला आहे. जिल्ह्यातील कर्मचारीदेखील या संपात सहभागी आहेत. शेवगाव येथील कर्मचारी सतीश जीवन दगडखैरे वय ४३ यांनी शनिवारी शनिवारी दुपारी विष प्राशन (Trying to suicide)केले. त्यांच्या कुटुंबियांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात नेऊन बरे वाटल्याने घरी आणले मात्र संध्याकाळी त्यांना पुन्हा अस्थवस्थ  वाटल्याने नगर येथे त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले.

दरम्यान एस कर्मचारी यांचा मुलगा विशाल याने हकीकत सांगितली की, वडील शेवगाव आगार अंतर्गत कार्यरत आहे. एसटीचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरण व पगारवाढ व्हावी याचे मानसिक टेन्शन त्यांना असून शकते. कामावर येण्याबाबत दबाव आणलेला नाही. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचा मुलगा याने सांगितले.

Web Title: ST employee poisoned trying to suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here