Sangamner Crime: मैत्रीण आणि तिच्या पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molested) केल्याची घटना.
संगमनेर: मैत्रीण आणि तिच्या पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या शेजारील गल्लीत राहणाऱ्या मुलाविरोधात मंगळवारी (दि. २३) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. २२) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही तिची मैत्रीण आणि मैत्रिणीचा पती यांच्यासोबत दुचाकीवरून नाष्टा करण्यासाठी जात होती. त्यावेळी तेथे जमजम कॉलनी परिसरात राहणारा फरदीन शेख हा पाठीमागून दुचाकीवरून आला. अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य त्याने केले. मुलीने आरडाओरड केल्याने शेख तेथून पळून गेला. घडला प्रकार मुलीने तिच्या घरी कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
Web Title: minor girl was molested in Sangamner
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App