Home क्राईम नात्याला काळिमा; नराधम मुलाने वडिलांचे हातपाय बांधून वडिलांसमोरच आईवर अत्याचार

नात्याला काळिमा; नराधम मुलाने वडिलांचे हातपाय बांधून वडिलांसमोरच आईवर अत्याचार

Hingoli Crime:  दारुड्या मुलाने आपल्याच आईवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ, मुलाने आधी वडिलांचे हातपाय बांधले आणि त्यानंतर वडिलांसमोरच आईवर बलात्कार.

on tied his father's hands and feet and rape his mother in front of his father

हिंगोली : जिल्ह्यात संतापजनक आणि नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका दारुड्या मुलाने आपल्याच आईवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या नराधम मुलाने आधी वडिलांचे हातपाय बांधले आणि त्यानंतर वडिलांसमोरच आईवर बलात्कार केला. याप्रकरणी दारुड्या मुलावर हिंगोलीच्या करमनुरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मुलाला दारु पिण्याची सवय होती. तर दारू पिऊन तो आपल्या आई-वडिलांना नेहमी त्रास द्यायचा. मात्र त्याने रविवारी मध्यरात्री जे कृत्य केलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या नराधम मुलाने आपल्याच आईवर अत्याचार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याचे आई-वडील झोपलेले होते. घरात आल्यावर त्याने आई-वडीलांना उठवत त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने भांडण सुरु केले. एवढंच नाहीत तर दारुसाठी पैसे देत नसल्याने आरोपीला खूपच राग आला. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांचे हातपाय बांधले. तसेच त्यांच्यासमोरच स्वतःच्या आईवर अत्याचार केले.

आईवर आरोपी मुलगा अत्याचार करत असल्याचे पाहून वडिलांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. मात्र आरोपी हा वडिलांना मारहाण करत असल्याने ते देखील हतबल झाले होते. मात्र दारूच्या नशेत असलेल्या नराधमाला कसलेही भान नव्हते.

ज्या आई-वडिलांनी जन्म दिला त्याच जन्मदात्या आईवर मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने हिंगोली जिल्हा हादरला आहे. पोटच्या लेकाने अत्याचार केल्यावर पिडीत महिलेने पतीसह पोलीस ठाणे गाठले. तर करमनुरी पोलीस ठाण्यात गेल्यावर पती-पत्नीने आपल्या मुलाने केलेल्या अत्याचाराची कहाणी कथन केली. पोटच्या मुलाने वडिलांचे हातपाय बांधून त्यांच्यासमोरच आपल्याच आईवर अत्याचार केल्याचं ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.

Web Title: on tied his father’s hands and feet and rape his mother in front of his father

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here