Home नंदुरबार धक्कादायक! मुलगा सुनेनंतर पित्याने दिला रेल्वेखाली जीव, तिघांची आत्महत्या

धक्कादायक! मुलगा सुनेनंतर पित्याने दिला रेल्वेखाली जीव, तिघांची आत्महत्या

Nandurbar Crime: वडिलांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिल्याने शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या (Suicide)  केल्याची घटना.

son-in-law, the father gave his life under the train, three committed suicide

नंदुरबार: वडिलांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिल्याने शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केली त्यानंतर पित्यानेही त्याच ठिकाणी जात धावत्या रेल्वेसमोर झोकून देत जीवन संपविले सावन सय्यद गावित (वय २१), रोशनी सावन गावित (१९) आणि सय्यद कर्मा गावित (५०) अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. सावन याने सोमवारी रात्री जेवण करीत असताना नवीन मोटारसायकलची मागणी केली. यावेळी वडील सय्यद गावित यांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिला. यातून वाद झाला होता.

त्यानंतर सावन हा पत्नी रोशनीसह घराबाहेर पडला होता. फुलफळी भागातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली पत्नीसह उडी घेत, दोघांनी जीवनयात्रा संपविली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास याची माहिती सय्यद गावित यांना कळल्यावर त्यांनी फुलफळी भागात धाव घेतली होती. त्यांनीही धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार सय्यद यांच्या पत्नी सुमित्रा यांना कळल्यावर त्यांनी एकच हंबरडा फोडला होता.

सय्यद गावित मोलमजुरी करीत होते. त्यांना चार मुली आणि सावन हा एकच मुलगा होता. फेब्रुवारीत मुलाचा विवाह झाला होता. संसार सुखाचा सुरु असताना, मुलाने टोकाचा निर्णय घेतला.

Web Title: son-in-law, the father gave his life under the train, three committed suicide

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here