प्रेमीयुगुलावर झाडल्या गोळ्या, दोघेही गंभीर
Nagpur Crime: प्रेमीयुगूल नागपूर- सावनेर मार्गावरील नांदा शिवारातील किल्ले कोलार या निर्जनस्थळी फिरायला गेले. अज्ञात तिघांनी त्यांच्यावर गोळीबार (Fired) केला. यात दोघेही गंभीर जखमी.
खापरखेडा | नागपूर: हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर प्रेमीयुगूल नागपूर- सावनेर मार्गावरील नांदा शिवारातील किल्ले कोलार या निर्जनस्थळी फिरायला गेले. अज्ञात तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना २२ मे रोजी रात्री घडली.
प्रवीण बोंडे हे त्यांच्या २४ वर्षीय मैत्रिणीसोबत रात्री फिरायला गेले होते. अनोळखी तिघांनी त्यांच्याजवळ येत तरुणीसोबत अश्लील वर्तन केले. तिने प्रतिकार करताच एकाने प्रवीणला धरून ठेवले.
तिघांनी या दोघांकडील रोख रक्कम व मोबाइल फोन हिसकावून घेत मोटारसायकलरून पळ काढला. तरुणीने दुचाकीवर मागे बसलेल्याला धरून खेचले. त्यातच एकाने तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी प्रवीणच्या पायात शिरली.
Web Title: Shots fired at lovers, both serious
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App