अहमदनगर: लॉजवर नेवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Ahmednagar News: लॉजवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) केल्या प्रकरणी एकाला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून लॉजचालक याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल.
श्रीगोंदा: पैठण बस स्थानक जवळील मेन रोडवर असलेल्या लॉजवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एकाला श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून लॉजचालक याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भोसले यांनी दिली.
श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला गावांतील एकाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिसात केली यावर श्रीगोंदा पोलिसांनी आरोपी तसेच मुलीच्या मोबाईल लोकेशन घेतला असता तो पैठण शहरात दाखवला. यावरून श्रीगोंदा पोलिसांच्या एका पथकाने पैठण गाठत लोकेशन चाचपणी केले असता तो एका लॉज मध्ये दाखवला त्यावरून पोलीस पथकाने लॉजवर धाड टाकत आरोपी व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. आरोपीने लॉजवर अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याने यादगार लॉज चालकावर सुद्धा कारवाई करण्यात आल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भोसले यांनी दिली. पैठण शहरातील लॉजिंगवर असे सर्रास प्रकार होत असून पोलिसांनी हे प्रकार थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
Web Title: minor girl was rape by being taken to a lodge
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App