Home क्राईम संगमनेर: कृषी अधिकार्‍याचे कार्यालयातीलच महिलेसोबतचे अश्लील चाळे व्हायरल अन…

संगमनेर: कृषी अधिकार्‍याचे कार्यालयातीलच महिलेसोबतचे अश्लील चाळे व्हायरल अन…

Sangamner Crime: पतीचे इतर महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध समजल्याने संतप्त झालेल्या कृषी अधिकार्‍याच्या पत्नीने आपल्या पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

Sangamner Crime Agriculture officer's indecent act with woman in office goes viral

संगमनेर:  येथील एका कृषी पर्यवेक्षकाचे कार्यालयातीलच महिलेसोबत सुरू असलेले अश्लील चाळे या कृषी अधिकार्‍याने एका ग्रुप वर व्हायरल केले. पतीचे इतर महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध समजल्याने संतप्त झालेल्या कृषी अधिकार्‍याच्या पत्नीने आपल्या पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी सुरेश कांतीलाल घोलप (वय 42) राहणार प्रेरणा नगर कॉलनी मालदाड रोड संगमनेर या कृषी अधिकार्‍याविरुद्ध भादंवि कलम 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  संगमनेर येथील कृषी कार्यालयातील एका पर्यवेक्षकाचे कार्यालयातील महिलेसोबत प्रेम संबंध आहेत. या कृषी परिवेक्षकाकडुन काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ते फोटो कृषीविभागीय ग्रुपवर पडले. त्याफोटो मध्ये कार्यालायातीलच महिला कृषी परिवेक्षकासोबत अश्लिल कृत्य करत असल्याचे अनेकांनी पाहिले. ते कृषी परिवेक्षकाच्या पत्नीला समजले. त्यातून दोघांचा वाद विकोपाला गेला.

कृषी परिवेक्षकाच्या पत्नीने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले. सदर महिलेने पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली. तुमचे अनैतिक संबंध बाहेर आहे. हे समजावून सांगण्यासाठी गेली असता, तु घरातून बाहेर जा, आता तु म्हतारी झाली आहे. असे म्हणून हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Sangamner Crime Agriculture officer’s indecent act with woman in office goes viral

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here