Home क्राईम शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Kalyan Crime: १४ वर्षाच्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर याच भागातील एका तरुणाने बलात्कार (Rape) केल्याची घटना.

a minor girl who was returning home from tuition was rape

कल्याण: कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात १४ वर्षाच्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर याच भागातील एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलगी शिकवणीवरुन घरी परत येत असताना तरुणाने तिला वाटेत गाठून तिला आड बाजुला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. कोळसेवाडी पोलिसांनी तक्रार दाखल होताच, तात्काळ तपास सुरू करुन विशाल गवळी या तरुणाला अटक केली आहे.  त्याच्यावर यापूर्वीही बलात्कारासह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी बुधवारी संध्याकाळी शिकवणी वर्गावरुन घरी जात होती. आरोपी विशाल याने त्या मुलीचा पाठलाग करुन तिला दमदाटी करत तिला आडबाजुला नेले. तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने प्रतिकार केला. त्याला विशालने दाद दिली नाही. विशालच्या तावडीतून सुटल्यावर पीडितेने घरी येऊन रस्त्यात घडला प्रकार सांगितला.

पीडितेच्या आई, वडिलांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. घडल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्याला बुधवारी रात्रीच कल्याण पूर्व भागातून अटक केली. विशालवर यापूर्वी तडिपारीची कारवाई झाली आहे. तडीपारी संपल्याने तो पुन्हा कल्याणमध्ये आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: a minor girl who was returning home from tuition was rape

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here