Home क्राईम खळबळजनक: नाग्या साक्या धरणाजवळ सेक्स रॅकेट

खळबळजनक: नाग्या साक्या धरणाजवळ सेक्स रॅकेट

Nashik Crime News : धरण परिसरातील त्या हॉटेलवर अनैतिक वेश्या व्यवसाय (Prostitution), हॉटेलवर पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत अवैधरित्या सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex racket) पर्दाफाश.

Prostitution racket exposed near Nagya Sakya dam in Nandgaon Taluka

नांदगाव | नाशिक:  नांदगांव शहरापासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या नाग्यासाक्या धरण परिसरातील एका हॉटेलवर पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत अवैधरित्या सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.  पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक व नांदगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोघा संशयितांसह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून धरण परिसरातील त्या हॉटेलवर अनैतिक वेश्या व्यवसाय सुरु होता. ग्रामीण पोलीस अधीक्षक उमप यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ही कारवाई झाली.

या ठिकाणी पोलिसांनी बनावट ग्राहक बनून संबंधित महिलेसोबत सौदा केल्यावर रचण्यात आलेल्या या सापळ्यात सदर महिला अडकली, मात्र याच सुमाराला या ठिकाणाहून काही महिला फरार झाल्याचे कळते तर काही महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. तालुक्यात प्रथमच देहविक्रीचे रॅकेट उघड झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली

नांदगाव तालुक्यातील सगळ्यात मोठे देहविक्रीचे रॅकेटचा पर्दाफाश करणे कामी नाशिक पोलिसांनी सापळा रचून मोहीम फत्ते केली.

नाशिक पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने हॉटेल वृंदावन दुपारी चार वाजता एक डमी गिऱ्हाईक बनवुन पाठविले असता, 1300 रुपयात सौदा ठरला. त्याप्रमाणे देहविक्री करीता पिडीत महिला हजर झाली.

वृंदावन हॉटेल चालक, संशयीत आरोपी अख्तार सोनावाला, भालु मुल्ला यांच्या सह पीड़ित महिला यांना रंगेहाथ पकडले. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक शहाजी उमंप, उप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उप विभागीय अधीक्षक सोहेल शेख, नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मागदर्शनाखाली नाशिक, SP पोलिस पथकातील, पीएसआय  अंकिता बाविस्कर, पोलिस हवालदार रावसाहेब कांबळे, नितिन डावकर, पोलिस शिपाई रामराजे, महिला पोलिस शिपाई मनिषा कुंझरे यांनी केली. नांदगाव पोलिस ठाण्यात मध्यरात्री उशीरा पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.

Web Title: Prostitution racket exposed near Nagya Sakya dam in Nandgaon Taluka

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here