Home क्राईम महसूलदिनीच नायब तहसीलदारला रंगेहाथ अटक,  शेतकऱ्याकडून स्विकारली तीन हजाराची लाच

महसूलदिनीच नायब तहसीलदारला रंगेहाथ अटक,  शेतकऱ्याकडून स्विकारली तीन हजाराची लाच

Vardha Crime: निवासी नायब तहसीलदाराने शेतकऱ्याकडून तीन हजारांची लाच (Bribe) घेताना रंगेहात पकडल्याची कारवाई.

Naib Tehsildar was arrested red-handed on the same revenue day, bribe of 3000 was accepted

वर्धा : निवासी नायब तहसीलदाराने शेतकऱ्याकडून तीन हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महसूल दिनाचा कार्यक्रम धुमधडाक्यात सुरु असतानाच देवळी येथील निवासी नायब तहसीलदाराने कार्यक्रम आटोपताच शेतकऱ्याकडून तीन हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई वर्धा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी देवळी येथील तहसील कार्यालयात करण्यात आली. किशोर शेंडे (वय ५१) असे लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव आहे.

वर्धा येथील मास्टर कॉलनी येथील रहिवासी तक्रारदार शेतकरी हा आपसी वाटणीपत्र तयार करण्याचे काम होते. त्यासाठी तो वारंवार तहसील कार्यालयाच्या येरझऱ्या मारत होता. मात्र, आपसी वाटणीपत्र तयार करण्यासाठी नायब तहसीलदार किशोर शेंडे याने १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती आठ हजार रुपयांत सौदा पक्का झाला. तीन हजार रुपये पहिले आणि पाच हजार रुपये नंतर देण्याचे ठरले होते.

सर्वत्र महसूल दिवस साजरा होत असतानाच नायब तहसीलदार शेंडे याने तक्रारदाराला तहसील कार्यालयात पैसे घेऊन बोलाविले. तक्रारदाराने जवळील तीन हजार रुपयांची रक्कम शेंडे याला देताच सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक लाच स्विकारताना नायब तहसीलदारास अटक केली.

Web Title: Naib Tehsildar was arrested red-handed on the same revenue day, a bribe of 3000 was accepted

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here