Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याने खळबळ

अहमदनगर: अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याने खळबळ

Rahuri News: अल्पवयीन मुलगी घरातून शाळेत गेल्यानंतर तिचे अपहरण (abduction).

minor girl's abduction in Rahuri Taluka

राहुरी: देवळाली प्रवरा परिसरातील इयत्ता ८ वीमध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी घरातून शाळेत गेल्यानंतर तिचे अपहरण करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीनुसार, घटनेतील अल्पवयीन मुलगी ही देवळाली प्रवरा परिसरात तिच्या आई-वडिलांसह राहते. ती इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ११च्या सुमारास शाळेत जाते, असे सांगून घरामधून गेली. सायंकाळपर्यंत मुलगी घरी न आल्याने तीच्या नातेवाइकांनी तिचा परिसरात व नातेवाइकांकडे शोध घेतला, परंतु ती कोठेही मिळून आली नाही. कोणीतरी आपल्या मुलीला पळवून नेले आहे, अशी तिच्या आई-वडिलांची खात्री झाली. त्यानंतर, त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: minor girl’s abduction in Rahuri Taluka

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here