Home क्राईम धर्मांतराचे आमिष दाखवत महिलेवर महिनाभर अत्याचार, फादरसह चौघांना अटक

धर्मांतराचे आमिष दाखवत महिलेवर महिनाभर अत्याचार, फादरसह चौघांना अटक

Nashik Crime News: ३५ वर्षीय महिलेस काम देण्याचे आणि धर्मातराचे आमिष दाखवून तिला महिनाभर एका घरात डांबून ठेवत अत्याचार (abused) केल्याची गंभीर घटना.

the woman was abused for a month by luring her to convert

नाशिक : मोलमजुरी करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेस काम देण्याचे आणि धर्मातराचे आमिष दाखवून तिला महिनाभर एका घरात डांबून ठेवत अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात कथित फादरसह पाच संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

नगर जिल्ह्यातील महिला आपल्या पती व तीन मुलांसह रोजगार मिळविण्यासाठी सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीत आली होती. ३० नोव्हेंबर रोजी सदर महिला माळेगाव येथून मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार शोधण्यासाठी जात असताना दोन महिलांनी

काम देतो, असे सांगून त्यांच्या घरी नेले. यावेळी दोन महिलांसह भाऊसाहेब उर्फ भावड्या दोडके या तिघांनी तिला धर्मांतराचे आमिष दाखवले. त्यांनी सायंकाळी घरी राहुल फादर या व्यक्तीला बोलावून घेतले. राहुल फादर याने काहीतरी पुटपुटत लाल रंगाचे पाणी या महिलेस पाजले व एक चित्र असलेले

पुस्तक दाखविले. त्या रात्री संशयित भावड्या याच्यासह फादरसह एका अनोळखी इसमानेही तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बुट्टी, प्रेरणा, भाऊसाहेब उर्फ भावड्या दोडके, राहुल फादर व एका अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह सिन्नर पोलिस ठाण्यातील कर्मचायांनी या गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या चौघांना अटक केली. भाऊसाहेब उर्फ भावड्या यादव दोडके (रा. जोशीवाडी), कथित फादर राहुल लक्ष्मण आरणे (रा. गौतमनगर, सिन्नर), रेणुका उर्फ बुट्टी यादव दोडके (रा. जोशीवाडी, सिन्नर) व प्रेरणा प्रकाश साळवे (रा. द्वारका, नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यातील एक जण मात्र फरार आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: the woman was abused for a month by luring her to convert

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here