महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संगमनेर शाखेत ६८ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक, गोल्ड व्हॅल्युअरचा गैरकारभार
Sangamner Crime: बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर आणि बनावट सोने बँकेत तारण ठेऊन बँकेची फसवणूक (Fraud) केल्याची घटना उघडकीस.
संगमनेर : महाराष्ट्र ग्रामीण बँक, संगमनेर बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर आणि बनावट सोने बँकेत तारण ठेऊन बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकूण ३२ जणांविरुद्ध रविवारी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदकिशोर नामदेव म्हस्के (शाखा प्रबंधक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संगमनेर शाखेत सदर प्रकार ३० जुलै २०२० ते १३ जानेवारी २०२३ दरम्यान घडला. यामध्ये बँकेची ६८ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. गोल्ड व्हॅल्युअर पदाचा गैरवापर झाल्याने हा प्रकार घडला आहे.
बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर जगदीश लक्ष्मण शहाणे (रा.संगमनेर) आणि खोटे सोने बँकेत तारण ठेवलेले असे एकूण ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोल्ड व्हॅल्युअर शहाणे याने एकूण १२७ गोल्ड लोनचे मूल्यमापन केले. आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी बँकेला बनावट सोने कर्ज वितरण केले. ऑडिटमध्ये ३३ खाती बनावट असल्याचे समोर आले आहे. या ३३ खात्यांमध्ये बँकेला बनावट सोने कर्ज वितरणातून होणाऱ्या तोट्यासाठी गोल्ड व्हॅल्युअर शहाणे हा जबाबदार आहेत. ३३ खात्यांतून पाच खाती संबंधित ग्राहकांनी बंद केली आहेत. असेही फिर्यादीत नमूद आहे. शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव पुढील तपास करीत आहे.
Web Title: 68 lakh 94 thousand rupees fraud in Sangamner branch of Maharashtra Gramin Bank
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App