Home संगमनेर संगमनेर घटना: ऊसतोड मजुराच्या मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू

संगमनेर घटना: ऊसतोड मजुराच्या मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू

Sangamner News: ऊस तोड मजुराच्या मुलाचा प्रवरा डाव्या कालव्यात पाय घसरून पडल्याने बुडून (drowned )मृत्यू झाल्याची घटना.

Sugarcane worker's son drowned in canal

संगमनेर: ऊस तोड मजुराच्या मुलाचा प्रवरा डाव्या कालव्यात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील आश्वी बु. येथे घडली. रितेश संदीप राठोड असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आश्वी बुद्रुक येथील प्रवरा डाव्या कालव्या वरील महादेव पुलाजवळ शेळके वस्तीवर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याच्या उसतोडणीसाठी जळगाव जिल्ह्यातील करगाव येथील ऊसतोडणीसाठी आलेले मजूर राहातात. ऊस तोडणी मजूर संदीप राठोड व त्याची पत्नी ऊस तोडणीस गेले होते. त्यांचा मुलगा रितेश संदीप राठोड वय ९ हा रविवारी दुपारच्या सुमारास प्रवरा डाव्या कालव्यावर गेला असता तेथे पाय घसरून तो कालव्यात पडला. ही बाब  तेथे असलेल्या तरुणांनी पहिली अन  त्याला पाहाताच पाण्यात उड्या मारुन शोध घेतला. त्याला बाहेर कडून उपचारासाठी त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर करगाव जिल्हा जळगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या घटनने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Sugarcane worker’s son drowned in canal

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here