Home श्रीगोंदा अखेर कोरोनाने मला गाठलेच: आ. बबनराव पाचपुते

अखेर कोरोनाने मला गाठलेच: आ. बबनराव पाचपुते

MLA Babanrao Pachpute Coorna Positive

आ. बबनराव पाचपुते करोना पॉझिटिव्ह 

श्रीगोंदा: श्रीगोंदा मतदार संघाचे आमदार बबनराव पाचपुते यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशियल मेडीयावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कातील व्यक्तीना करोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटद्वारे जनतेला असा संदेश लिहिला आहे की, विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी माझी कोरोना चाचणी केली असता, मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मला कोणतीही लक्षणे नसून तब्बेत अगदी ठणठणीत आहे.

गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी आणि शक्यतो डॉक्टरांचा सल्ला लक्षात घ्यावा. आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी लवकरच आपल्या सेवेत हजर होईल.

धन्यवाद!

आपला,

आ. बबनराव पाचपुते,

माजी मंत्री.

Web Title: MLA Babanrao Pachpute Coorna Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here