Home अकोले अकोले तालुक्यातील मोबाईल शॉपी फोडणाऱ्याला अटक

अकोले तालुक्यातील मोबाईल शॉपी फोडणाऱ्याला अटक

 

Mobile shop blower arrested in Akole taluka sat

अकोले | Akole: मोबाईल शॉपी फोडणाऱ्या आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपी योगेश काळू निरगुडे रा. शिवडे ता.सिन्नर जि. नाशिक व त्याचे साथीदार यांनी मोबाईल शॉपी फोडून चोरी मोबाईल चोरी करण्यात आली होती.

याबाबत संजय शिवनाथ शेळके रा. देवठाण ता. अकोले याने फिर्याद दिल्याने अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती समजली की, योगेश काळू निरगुडे वय २० ता. सिन्नर याने हा गुन्हा केलेला आहे.

आरोपी योगेश काळू निरगुडे यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केला असल्याचे कबुल केले आहे. आरोपी मयूर अशोक कातोरे, सोमनाथ कातोरे, अमोल भाऊराव भगत यांनी एकत्रित येऊन हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. हे इतर आरोपी पसार झाले आहेत. या आरोपींनी मोबाईल शॉपी फोडून २९ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या आरोपीकडून पाच हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.  

Web Title: Mobile shop blower arrested in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here