Home नाशिक आमदार कपिल पाटील सत्यजित तांबे यांना पाठींबा देणार का? जाणून घ्या

आमदार कपिल पाटील सत्यजित तांबे यांना पाठींबा देणार का? जाणून घ्या

Nashik Graduate Constituency Election | Satyajeet Tambe:  लोकभारतीचे आमदार कपिल पाटील (Kapil Patil) हे आज नाशिक मध्ये पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधणार आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषद घेत असून ते पाठींब्यासंदर्भात घोषणा करणार.

Will MLA Kapil Patil support Satyajeet Tambe

नाशिक: नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून आता शिक्षक लोकभारतीचे आमदार कपिल पाटील हे आज नाशिक मध्ये पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधणार आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषद घेत असून ते पाठींब्यासंदर्भात घोषणा करणार असल्याच्या चर्चा आहेत

नाशिक विधान परिषद पदवीधर निवडणूक यंदा खास चर्चेत राहिली उमेदवारी अर्जापासून ते पाठींब्यापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अजूनही या घडामोडीन पूर्णविराम मिळाला नाहीये. दरम्यान याच संदर्भात शिक्षक लोकभारतीचे आमदार कपिल पाटील हे आज नाशिक मध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत याच पत्रकार परिषदेत कपिल पाटील पाठिंबा देण्यासंदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

आज पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करणार आहेत तर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच सत्यजित तांबे देखील मे पत्रकार परिषदेता उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागून असेल.

नाशिक पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात अनेक वेगवान घडामोडी घडल्या पाठीव्यावरून देखील ही निवडणूक चर्चेत आहे. या निवडणुकीत पाठिंबा देण्यावरून दुमालाचे वारे वाहताना दिसून येत आहे. ठाकरे गट काँग्रेस महाविकास आघाडी आणि अगदी टीचर्स डेमॉक्रेटिक फ्रंट संघटनेत देखीत हेच कारे दिसून येत आहेत पाठीच्या संदर्भात टीचर्स डेटिक फ्रंट (टीडीएफ) संघटनेत देखीत दोन गट पडले आहेत.

काँग्रेस पक्षात असो अथवा मविआ पाठींब्यावरून मत विभागलेले दिसत आहे. दोन पक्षांत मत दुभागले गेले आहेत. माविआने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र ठाकरे गटा नंतर आता काँग्रेस मध्ये देखील पाठिंब्या वरून दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. ‘वेळेला सत्यजित आणि सुधीर तांबेच धावून आले. तांबेनी सुमारे १ लाख पेक्षा जास्त मतदार नोंदवले आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे बाबत हायकमांड ने सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सचिव राहुल दिवे यांनी केली आहे. त्यामुळे हि निवडणूक कोणते वेगळे वळण घेते ? याकडे लक्ष आहे. त्यासोबतच रोमांचक ठरत असलेल्या या निवडणुकीत शिक्षक लोकभारतीचे आमदार कपिल पाटील काय घोषणा करणार याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: Will MLA Kapil Patil support Satyajeet Tambe

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here