Home संगमनेर संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सश्रम कारावास

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दहा वर्षे सश्रम कारावास

Sangamner Crime:  आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Rape) केल्या प्रकरणी नराधमास सात वर्षानंतर १० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Ten years rigorous imprisonment for rape a minor girl

संगमनेर : आपल्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी नराधम असणारा छगन मच्छिंद्र खेमनर यास अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. यांनी सात वर्षानंतर १० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जांभुळवाडी येथील रहिवासी असणारा छगन मच्छिंद्र खेमनर याने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीशी जवळीक केली. एके दिवशी त्याचे शेतात मजुरीसाठी तिला पाठवा, असे तिच्या आई-वडिलांना सांगितले. नात्यातलाच मुलगा असल्यामुळे आई-वडिलांनी त्याच्याबरोबर तिला पाठवले. खेमनर याने तिला शेतात कामासाठी न नेता थेट एका जंगलात नेले. या ठिकाणी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. जर ही घटना कोणाला सांगितली तर तुला जीवेच ठार मारीन, अशी धमकी दिली. यानंतर तिला मोटरसायकल वरून तिच्या घरी नेऊन सोडले.

घरी गेल्यानंतर ती रडत थेट आई- वडिलांकडे गेली आणि झालेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर तिने आई- वडिलांसोबत थेट घारगाव पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या फिर्यादीवरून छगन खेमनर याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

यानंतर तात्कालिन पो. नि. दिलीप निघोट यांनी खेमनर याच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

या अत्याचार प्रकरणाचा खटला तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर सुरू होता. तब्बल सात वर्षानंतर संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या खटल्या एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

सरकारी पक्षाचे वकील संजय वाकचौरे यांनी जोरदार युक्तिवाद केला. या सर्वांचे ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी छगन मच्छिंद्र खेमनर यास १० वर्षे सश्रम कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: Ten years rigorous imprisonment for rape a minor girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here