Home महाराष्ट्र ब्रेकिंग: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

ब्रेकिंग: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

MLA Santosh Bangar: मारहाणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल, गुन्हा दाखल.

Shinde group MLA Santosh Bangar in trouble, case filed against in Hingoli

MLA Santosh Bangar : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.  शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर  चांगलेच अडचणीत आले आहे. आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत प्राचार्यांना मारहाण करणं त्यांना चांगलच भोवलं आहे. शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेसह 40 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिंदे गटाचे आमदार  बांगर यांनी प्राचार्यांना मारहाण केली तसेच त्यांचा कानही पिरगळा होता. या मारहाणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. याआधीही संतोष बांगर यांनी मारहाण केल्याचे पुढे आले आहे. हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मारहाण प्रकरणी  बांगर यांच्यासह त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसचे महाविद्यालयातील पाच अधिकाऱ्यांवरही या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shinde group MLA Santosh Bangar in trouble, case filed against in Hingoli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here