Home संगमनेर मनसेच्या या नेत्याने इंदोरीकर महाराजांची घरी जाऊन घेतली भेट

मनसेच्या या नेत्याने इंदोरीकर महाराजांची घरी जाऊन घेतली भेट

संगमनेर: मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी शनिवारी इंदोरीकर महाराज यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे घरी येऊन भेट घेतली.

पानसे यांनी इंदोरीकर महाराजांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधला, पानसे म्हणाले एखाद्या छोट्या चुकीची दिलगिरी महाराजांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे चांगले कार्य घडत आहे. त्यांनी समाज घडविला आहे. स्वतःची शाळा काढलेली आहे. त्यांचे हे मोठे कार्य आपण विसरणार आहोत का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत झोळेकर, बाबासाहेब शिंदे, तुषार बोंबले यावेळी उपस्थित होते.    

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: MNS Leader meets Indorikar Maharaj in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here