Home जामखेड अहमदनगर:  अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुलगी  घरासमोर झोपलेली असताना….

अहमदनगर:  अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुलगी  घरासमोर झोपलेली असताना….

Ahmednagar News:  पिंपळगाव आळवा येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation) करण्याचा प्रकार.

Molestation of a minor girl kharda

खर्डा:  जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार मंगळवारी (दि. १३) घडला. याप्रकरणी पोस्कोसह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी एका तासात अटक केली.

मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या घरासमोर झोपलेली असताना आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिचा विनयभंग केला. यानुसार ऋतुराज भारत बारवकर (वय २०) याच्याविरुद्ध विनयभंग, पोस्कोसह इतर गुन्हे खर्डा (ता. जामखेड) पोलिसात दाखल करण्यात आले.

खर्डा पोलिसांनी अवघ्या एका तासात त्याला अटक केली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर, पोलिस नाईक संभाजी शेंडे, पोलिस कॉन्स्टेबल शेषराव म्हस्के, बाळू खाडे, दीपक बारवकर यांनी केली.

Web Title: Molestation of a minor girl

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here