अकोले तालुक्यात घरफोड्या सत्र, तीन लाखांचे सोने चोरीला
Akole News: कोतुळातील मध्यवस्तीत चोरट्यांनी चार घरफोड्या करून तीन लाखांचे सोने व सहा हजार रोख चोरून पोबारा (Theft).
कोतूळ | Kotul: अकोले शहरातील चोरी नंतर आता कोतूळात मध्यवस्तीत घरफोड्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि.१९) पहाटे पाच वाजता कोतुळातील मध्यवस्तीत चोरट्यांनी चार घरफोड्या करून तीन लाखांचे सोने व सहा हजार रोख चोरून पोबारा केला. घरफोडीची ही घटना मध्यवस्तीत गजबजलेल्या ठिकाणी घडली.
सोमवारी पहाटे पाच वाजता मुंजोबा चौकातील उत्तमराव देशमुख यांच्या घराला कुलूप होते. कुटुंब शेतातील घरी होते. चोरट्यांनी कटरने कुलूप कापून एक सोन्याची अंगठी, कानातील दागिने असा दीड लाखांचा ऐवज पळवून नेला. ललिता गुजर यांच्या मुख्य चौकातील घर फोडून दोन तोळे सोन्याची पोत व रोख सहा हजार रुपये चोरले. तर अमोल गंभीरे (कुंभारवाडा), प्रकाशशेठ भुजबळ (मुंजोबा चौक) यांचीही घरे फोडली. ग्रामपंचायतने बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व थरार कैद झाला आहे.
Web Title: Theft broke into four houses and stole gold worth three lakhs and six thousand in cash
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App