Home अहमदनगर अहमदनगर: महिलेचा घरात घुसून विनयभंग

अहमदनगर: महिलेचा घरात घुसून विनयभंग

molestation woman Ahmednagar

Ahmednagar | अहमदनगर: नगर शहरातील एका २४ वर्षीय महिलेचा घरात घुसून विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर यमुल  रा. श्रमिकनगर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. घरात बळजबरीने घुसून हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत महिलेचा विनयभंग केला.

25 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरामध्ये असताना शंकर येमूल हा बळजबरीने त्यांच्या घरात घुसला. त्याने फिर्यादीचा उजवा हात धरून त्यांना त्याच्या जवळ ओढले. त्यांच्यासोबत गैरवर्तन करून शंकर येमूल तेथून निघून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 1 मार्च रोजी फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात येत विनयभंग करणारा शंकर येमूल याच्या विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: molestation woman Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here