Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: दरोडेखोरांची दहशत, धारदार शस्त्रांचा वापर करीत दरोडा, एक जणाचा मृत्यू...

अहमदनगर ब्रेकिंग: दरोडेखोरांची दहशत, धारदार शस्त्रांचा वापर करीत दरोडा, एक जणाचा मृत्यू तर दोघे जखमी

Robbery using sharp weapons Theft, killing one and injuring two

Ahmednagar | Nevasa Theft | नेवासा:  नेवासा तालुक्यातील चांदा येथील कर्डिले वस्तीवर काल महाशिवरात्रीच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी चांगलीच दहशत घातली. वस्तीवरील लोकांना मारहाण करून लुटले.

चोरट्यांशी झालेल्या झटापटीत कर्डिले वस्ती वरील तिघे जण जबर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

कर्डीले वस्तीवर झालेल्या भयानक दरोड्यात (Robbery)गंभीर जखमी झालेल्या ओंकार गंगाधर कर्डिले (वय २१) या युवकाच नगर येथील दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले आहे .

चांदा लोहारवाडी रोड वरील कर्डिले वस्ती या ठिकाणी काल महाशिवरात्रीच्या रात्री साधारण 12 ते 1 च्या दरम्यान चोरट्यांनी बापू भाऊसाहेब कर्डिले यांच्या वस्तीवर प्रवेश केला. त्यांच्या सौभाग्यवती अर्चना ताई कर्डिले व आई नर्मदा कर्डिले यांना दहशत करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवून नेले. यावेळी बापू कर्डिले त्यांचे चुलते गंगाधर नामदेव कर्डिले, सुभाष नामदेव कर्डिले आधी सर्व जण कर्डिले वस्तीवरील लोक जागे होऊन त्यांच्या पाठीमागे पळाली.

शेजारीच कांद्याच्या शेतात त्यांनी एकाला पकडले मात्र पाठीमागून अंधारात लपून बसलेल्या दुसऱ्याने पळत येऊन त्यातील तिघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आपली लोक जखमी झाल्याचे पाहून कर्डिले वस्ती वरील लोकांनी चोरट्याला सोडुन जखमींना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

या घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल फोजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पहाटे तीन वाजेच्या दरम्यान श्वान पथकही आले होते. सकाळी 9 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासास सुरुवात केली आहे.

Web Title: Robbery using sharp weapons Theft, killing one and injuring two

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here