Home महाराष्ट्र राज्याच्या या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

राज्याच्या या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

rain Alert with strong winds and thunderstorms in these districts

Rain Alert | मुंबई : राज्यात येत्या तीन ते चार दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये धुळे, नाशिक आणि नंदुरबार  जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुण्यातील IMD हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी 3 मार्चची संध्याकाळ ते 5 मार्च या कालावधीत काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं सांगण्यात आले आहे. तसेच  तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलसह दक्षिणेकडील भारताच्या काही द्वीपकल्पीय भागांमध्ये जोरदार पावसाची (Rain) शक्यता असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे असल्याचंही कश्यपी यांनी सांगितलं.

Web Title: rain Alert with strong winds and thunderstorms in these districts

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here