संगमनेर: बहिणीचा विनयभंग करत भावाला मारहाण, तिघांवर गुन्हा
Sangamner Crime: मुलीची छेड काढत विनयभंग (Molested), तर मुलीच्या भावाला मारहाण.
संगमनेर : तुम्ही येथील रहिवासी नाहीत, तुम्हाला येथून पळवून लावू असे म्हणत बहीण-भावाला शिवीगाळ करत मारहाण करत मुलीचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर शहरातील जमजम कॉलनी परिसरात रविवारी (दि. १०) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १८ वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान युनूस शेख, जुनेद युनूस शेख (दोघेही रा. नॅशनल स्कूलजवळ, कोल्हेवाडी रस्ता), फरदिन अन्सार शेख (रा. मदिनानगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, १८ वर्षीय युवक आणि त्याची बहीण हे दोघेच घरात असताना सलमान शेख, जुनेद शेख आणि फरदिन शेख हे तिघे त्यांच्या घरी गेले. सलमान आणि जुनेद या दोघांनी मुलीची छेड काढत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तिचा भाऊ त्यांना समजावून सांगत असताना तिघांनीही बहीण-भावाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: molested by sister, beaten up Brother, crime against three
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App