Home अहमदनगर अहमदनगर: तरुणीचा विनयभंग, घरासमोर तार कंपाउंड करीत असताना…

अहमदनगर: तरुणीचा विनयभंग, घरासमोर तार कंपाउंड करीत असताना…

Ahmednagar | Molested:  २८ वर्षीय तरुणी ही तिच्या घरासमोर तार कंपाउंड करीत असताना आरोपींनी तार कंपाउंड करण्यास मज्जाव केला, मारहाण व विनयभंग.

Molested of young woman while compounding wire in front of house

राहुरी | Rahuri : येथील २८ वर्षीय तरुणी ही तिच्या घरासमोर तार कंपाउंड करीत असताना आरोपींनी तार कंपाउंड करण्यास मज्जाव केला. केले. तसेच तिला लाथा-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना १० डिसेंबरला घडली. या प्रकरणी आठ जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहत्या घरासमोर तार कंपाउंडचे काम करू नकोस. ही जागा आमची आहे. तुझ्या वडिलांनी आम्हाला वापरायला दिली होती, असे आरोपींनी तरुणीला सांगितले. त्यावेळी जागा माझ्या नावावर असून, मी माझ्या जागेमध्ये कंपाउंडचे काम करीत आहे. तुम्ही मध्ये येऊ नका. त्यावेळी आरोपींनी तरुणीला शिवीगाळ केली. लाथा-बुक्क्यांनी, दगडाने मारहाण करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

एकाच वेळी दोन पदांवर पल्लवी बांडेची निवड, काय आहे तिच्या यशामागील गुपित जाणून घ्या | Motivational

तरुणीच्या फिर्यादीवरून किशोर विठ्ठल पातोरे, वत्सला विठ्ठल पातोरे, लता हिरामण पातोरे, लक्ष्मी हिरामण पातोरे, गणेश हिरामण पातोरे, सारिका सुरेश पातोरे, खुशी सुरेश पातोरे, यश सुरेश पातोरे (सर्व, राहणार मुलनमाथा, राहुरी) या आठजणांवर मारहाण व विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात करीत आहे.

Web Title: Molested of young woman while compounding wire in front of house

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here