Home औरंगाबाद Suicide: नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या, पत्नीने घरी, तर पतीने पुलाखाली घेतला गळफास

Suicide: नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या, पत्नीने घरी, तर पतीने पुलाखाली घेतला गळफास

Suicide News: औरंगाबाद जिल्ह्यात नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या.

suicide of newly married couple

औरंगाबाद: घटांब्री येथील रहिवासी तथा चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथे पोस्टमास्तर असलेल्या विकास यांचा विवाह एप्रिल २०२२ रोजी दहिगाव येथील सपनासोबत झाला होता. काही सिल्लोड (जि. औरंगाबाद) दिवसांपासून ते दोघे कुटुंबीयांपासून तालुक्यातील घटांब्री येथील वेगळी खोली करून अलिप्त राहत नवविवाहित दाम्पत्याने रविवारी होते. वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. अगोदर पत्नीने राहत्या घरी साडेअकरा वाजता गळफास घेतला, तर पोस्टमास्तर असलेल्या पतीने दीड वाजता बोजगाव येथील खेळणा नदीच्या पुलाखाली गळफास घेतला.

अवघ्या आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. विकास गणपत तायडे (२६) व सपना विकास तायडे (२१) अशी त्यांची नावे आहेत.

एकाच वेळी दोन पदांवर पल्लवी बांडेची निवड, काय आहे तिच्या यशामागील गुपित जाणून घ्या | Motivational

दोघांचाही संसार सुखाचा सुरू असताना अचानक रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सपनाने राहत्या घरात गळफास घेतला. त्यावेळी विकास हे सिल्लोडला मोटारसायकलची सर्व्हिसिंग करण्यासाठी गेलेले होते. त्यांना पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी कळताच त्यांनीसुद्धा रस्त्याने परत येताना अंभईजवळील बोजगाव येथील खेळणा नदीच्या पुलाखाली दुपारी १ वाजेच्या सुमारास गळफास घेतला.

या दाम्पत्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले असावे, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. रविवारी रात्री घटांब्री येथे दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: suicide of newly married couple

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here