Home महाराष्ट्र पैशाचा पाउस पाडण्याचे आमिष: मांत्रिकासह चौघांना अटक

पैशाचा पाउस पाडण्याचे आमिष: मांत्रिकासह चौघांना अटक

Money laundering Four arrested, including witch

सांगली: दैवी शक्तीच्या आधारे पैशाचा पाउस पाडून देतो असे म्हणत १५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या आणखी चौघांना (Money laundering Four arrested) पोलिसांनी अटक केली आहे.

मांत्रिक रोहित भालचंद्र बेन्नाळकर वय ३४ रा. अकलूज, संदीप सुभाष पाटील वय ३१ रा. अंजनी ता.तासगाव, रोहित महादेव एवळे वय ३२ रा. खणभाग सांगली, अरुण शिवलिंग कोरे वय ३३ रा. म्हैसाळ ता. मिरज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सांगलीतील बादशहा पाथरवटसह दोघांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. याबाबत सुनील मोतीलाल व्हटकर रा. बुधवार पेठ सोलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोलापुरात राहणाऱ्या व्हटकर यांना त्यांच्या परिचित असलेल्या शिवानंद हाचगे याने संशियीत मांत्रिक आणि पाथरवट पती पत्नीची ओळख करून दिली होती.

चौघांनी संगनमत १५ मे ते २० जून या कालावधीत व्हटकर यांना अंकली येथे बोलावून घेतले. तेथे जडीबुटीच्या सहायाने व दैवी शक्तीने तुमच्या घरी जास्तीत जास्त पैसे मिळतील तुमच्या घरी पैशाचा पाउस पडेल असे आमिष दाखविले. यासाठी लागणारी जडीबुटी आणण्यासाठी व्हटकर यांच्याकडून वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच व्हटकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

Web Titile: Money laundering Four arrested, including witch

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here