Home महाराष्ट्र Monsoon 2022: मान्सून येत्या दोन दिवसांत कोकणात होणार दाखल

Monsoon 2022: मान्सून येत्या दोन दिवसांत कोकणात होणार दाखल

Monsoon will arrive in Konkan in next two days

मुंबई | Monsoon 2022: मान्सूनचा प्रवास वेगात सुरु आहे. शुक्रवारी तो राज्याच्या दक्षिण कोकणात तसेच गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचा अंदाज भारतीयशास्त्र हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढच्या दोन दिवसांत कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. एरवी 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.

केरळपासून नंतर कर्नाटकपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे दोन दिवसांत तो गोवा आणि दक्षिण कोकणात दाखल होऊ शकतो, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. असं असलं तरी मुंबईकरांना मात्र आणखी आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सून 10 जूननंतरच मुंबईत येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Web Title: Monsoon will arrive in Konkan in next two days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here