Home अहमदनगर Murder Case | राहता हादरले! तरुणाची शस्त्राने वार करून हत्या

Murder Case | राहता हादरले! तरुणाची शस्त्राने वार करून हत्या

Ahmednagar rahata Youth Murder Case

Ahmednagar News | राहाता | Rahata Murder Case: मागील भांडणाच्या कारणावरून राहाता शहरातील आंबेडकर नगर येथे योगेश किसन वाघमारे या २३ वर्षीय तरुणाचा शस्त्राने वार करीत निर्घुण हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. राहाता शहरातील आंबेडकर नगर मधील शासकीय घरकुलाच्या इमारतीत बुधवार दिनांक १ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने राहता शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

जखमी अवस्थेत योगेश यास शिर्डी येथे साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात दाखल केले असता. त्यास मयत  असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याचे छातीवर तसेच इतर ठिकाणी शस्त्राने गंभीर घाव करून त्याचा खून करण्यात आला आहे. माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना कडक शासन करावे, योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृताचे वडिल व नातेवाईकांनी केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली.असून या घटनेतील मुख्य आरोपी रवींद्र कटारनवरे यास जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत नातेवाइकांनी काही क्षण रस्ता रोको केला. पोलिस ठाण्यासमोर धरणे धरत गुन्हेगारांवर कड्क कारवाई करण्याची मागणी केली होती.

शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी मुख्य आरोपीस पकडण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आली. असून लवकरच आरोपीस ताब्यात घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर मृताचे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिला त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात पाठवला होता.

मयत योगेश वाघमारे यांचे वडिल किसन वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ललित पाळंदे, राहूल पाळंदे, रवी दशरथ कटारनवरे, विरेन उर्फ पिंटू दशरथ कटारनवरे, दशरथ कटारनवरे, भूषण संजू निकाळे, योगेश संजू निकाळे, संजय दादू निकाळे, रतनबाई दशरथ कटारनवरे, मनीषा वाघमारे, अमित चंद्रकांत वाघमारे, संगिता संजय निकाळे, उत्कर्ष उर्फ भैय्या सोमनाथ लुटे, सोमनाथ लुटे, विशाल मोकळ, महेश सोमनाथ पाळंदे, गौतम सोमनाथ पाळंदे,अमोल सोमनाथ पाळंदे सर्व राहणार राहता यांचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Ahmednagar rahata Youth Murder Case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here