Home महाराष्ट्र Suicide | आईने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

Suicide | आईने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या

mother commits suicide by jumping into a well with her two young children

सोलापूर | Solapur : सोलापूर येथील आलेगाव शिवारात आईने मुलांसह आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या आत्महत्येची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात करण्यात आली.

सोनाली सिद्राम चोपडे, मोठा मुलगा संतोष सिद्राम चोपडे (वय- ८), लहान मुलगा संदीप चोपडे (वय- ५) सर्व राहणार तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर अशी मयत झालेल्यांची नावे आहे. आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर ३०/ २ चे मालक दयानंद वसंत शिंदे यांचे शेतातील विहिरीतील उडी मारल्याने पाण्यात बुडून मयत झाले आहे. आईच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: mother commits suicide by jumping into a well with her two young children

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here