Home औरंगाबाद मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचे सेक्स रॅकेट उघड, घरावर छापा, तिघे अटकेत

मुलगी, जावयाच्या मदतीने सासूचे सेक्स रॅकेट उघड, घरावर छापा, तिघे अटकेत

Breaking News | Crime: मुलगी व जावयाच्या मदतीने सातारा, नक्षत्रवाडीत राजरोस सेक्स रॅकेट सुरू. (Sex Racket)

Mother-in-law's sex racket exposed with the help of daughter, son-in-law, house raided

छत्रपती संभाजीनगर: उच्चभ्रू वसाहतीत भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन माधुरी सुरेश थोरात (४२, रा. विटखेडा) हिने मुलगी व जावयाच्या मदतीने सातारा, नक्षत्रवाडीत राजरोस सेक्स रॅकेट सुरू केले. अहमदनगर, नाशिकच्या मुलींना घरी आणून माधुरी हा देहविक्रीचा धंदा करत होती.

उपायुक्तांच्या पथकाने रविवारी रात्री डमी ग्राहक पाठवून दोन घरांमध्ये छापा टाकत माधुरीसह जावई शरद संजय साबळे (२९) व रोहिणी शरद साबळे (२१) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या तावडीतून ५ पीडितांची सुटका करण्यात आली. गेल्या महिनाभरात शहरात सेक्स रॅकेटवरील ही सातवी कारवाई आहे. पोलिसांनी रविवारी रात्री सापळा रचला. डमी ग्राहक व शरदमध्ये पैशांचा व्यवहार ठरल्यानंतर देहविक्रीची खात्री झाली. पोलिसांनी साताऱ्यातील गोपालनगरमध्ये सी. आर. रेसिडेन्सीच्या फ्लॅट क्रमांक ३ मध्ये छापा टाकला. तेव्हा शरदसह त्याची पत्नी रोहिणी उपस्थित होती. तेथील पीडितेच्या चौकशीत शरदची सासू माधुरीच्या घरी आणखी मुली असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी माधुरीचे घर गाठले असता तेथे चार पीडिता होत्या. माधुरीनेदेखील देहविक्रीसाठी मुली पुरवत असल्याची कबुली दिली. पीडितांची सुधारगृहात रवानगी करून तिघांना अटक करण्यात आली. शरदने पोलिसांच्या डमी ग्राहकाला व्हॉट्सअॅपवर पाच मुलींची छायाचित्र पाठवली. ३ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. पैशांचा व्यवहार होताच त्याने फ्लॅटमधून पोलिसांना ‘हाय’चा मेसेज पाठवण्याचा इशारा ठरला होता. डमी ग्राहकाकडून मेसेज प्राप्त होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी फ्लॅट गाठला.

Web Title: Mother-in-law’s sex racket exposed with the help of daughter, son-in-law, house raided

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here