Home अहमदनगर अहमदनगर: अडीच वर्षांच्या मुलासह आई बेपत्ता

अहमदनगर: अडीच वर्षांच्या मुलासह आई बेपत्ता

Ahmednagar | Shrirampur missing Case:  अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन बेलापूर खुर्द येथील विवाहित महिला पुलावरून बेपत्ता.

Mother missing with two-and-a-half-year-old son

श्रीरामपूर: आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन बेलापूर खुर्द येथील विवाहित महिला पुलावरून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

स्वाती बाळासाहेब सोनुळे (वय ३१) ही विवाहित महिला कुणाल बाळासाहेब सोनुळे या अडीच वर्षे वयाच्या तिच्या मुलास घेऊन (दि. ७) ऑक्टोबर सकाळी ११ वाजेपासून बेलापूर खुर्द येथील पुलावरून बेपत्ता झाली आहे. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके करत आहेत. सदरची महिला व मुलगा कुठे आढळल्यास अथवा याबाबत काही माहिती असल्यास बेलापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके यांनी केले आहे.

Web Title: Mother missing with two-and-a-half-year-old son

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here