Home अहमदनगर अहमदनगर: मुलासाठी आईने घेतली नदीत उडी

अहमदनगर: मुलासाठी आईने घेतली नदीत उडी

Ahmednagar:  मुलगा गेला वाहून (River): म्हेसे खुर्द येथील घटना.

Mother took a jump in the river for her son

पारनेर : पारनेर तालुक्यातील म्हेसे खुर्द येथे नदीत पडलेल्या बारा वर्षांच्या मुलाला वाचविण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. मात्र, प्रवाहात मुलगा वाहून गेला. ग्रामस्थांसह आपत्ती व्यवस्थापन पथकाने सायंकाळपर्यंत शोध घेतला. मुलगा मात्र मिळून आला नाही. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

अक्षय राहुल गायकवाड (वय १२) असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. म्हेसे खुर्द गावातून कुकडी नदी वाहते. राहुल याची आई नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत राहुलही गेला होता. यावेळी तो नदीत पाय घसरून पडला. मुलगा नदीत पडल्याचे पाहून त्याच्या आईनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने राहुल सापडला नाही. शेवटी निराश झालेली आई पाण्याबाहेर आली. यावेळी राहुल याचे वडीलही त्यांच्याबरोबर होते मात्र ते मूकबधीर असल्याने व त्यांना पोहता येत नसल्याने ते काही करू शकले नाहीत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सरपंच प्रवीण उदमले, उपसरपंच नवनीत येळभर, सोमनाथ बडे, मच्छिंद्र मदगे, शेजारच्या म्हेसे बुद्रुकचे सरपंच काळूराम पवार, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग खाडे व तरुणांनी नदीत उड्या घेऊन राहुल याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. दरम्यान, एनडीआरएफच्या पथकानेही शोध घेतला. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवावी लागली.

Web Title: Mother took a jump in the river for her son

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here