Home अहमदनगर ब्रेकिंग न्यूज! मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या आईचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू

ब्रेकिंग न्यूज! मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या आईचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू

Breaking News | Ahmednagar: मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या आईचा अपघाती मृत्यू (Death) झाल्याची घटना.

mother who was going to meet her daughter was crushed to death under the wheels of a truck

कोपरगाव: लोणी येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या आईचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात लासलगाव-शिर्डी रस्त्यावर रविवारी दुपारी घडली. या अपघातात महिलेचा पती बचावला आहे.

आरती सुभाष राऊत (वय ३५, रा. वणी बाबापूर, जि. नाशिक) असे ट्रकच्या मागील चाकाखाली येवून मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. आरती राऊत या त्यांचे पती सुभाष गुलाब राऊत यांच्यासोबत दुचाकीवरून लासलगाव-शिर्डी रस्त्याने लोणी येथे शिक्षण घेत असलेली श्रद्धा हीला भेटण्यासाठी रविवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी निघाल्या होत्या. हे दोघे कोळपेवाडी शिवारात असताना त्यांना एमएच १८ बीजी ६५७९ क्रमांकाच्या ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दोघे खाली पडले. आरती राऊत या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू

झाला. सुभाष राऊत बाजुला फेकले गेल्याने बचावले आहेत. घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेन करण्यासाठी दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुभाष राऊत यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक योगेश सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: mother who was going to meet her daughter was crushed to death under the wheels of a truck

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here