Home महाराष्ट्र नात्याला काळिमा! जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार

नात्याला काळिमा! जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार

Crime News: पोटाच्या मुलीवर अत्याचार (raped), याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी.

Pat's daughter was repeatedly raped with death threats

भाईंदर: बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर  आली आहे.  १४ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देत जन्मदात्या पित्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार मोठ्या बहिणीला सांगितल्यानंतर आरोपी पित्याचे लज्जास्पद कृत्य उघडकीस आले आहे.  याप्रकरणी नवघर पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, , आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पीडिताला धमकावत तिच्यावर बलात्कार करत होता. पीडिता घरी एकटी असताना आरोपी तिचा गैरफायदा घेत असे. पीडिताने विरोध केल्यास आरोपी तर तो तिला बेदम मारहाण करायचा. शारिरिक आणि मानसिक त्रासाला वैतागून पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या मोठ्या बहिणीच्या कानावर घातला. यानंतर पीडिताच्या मोठ्या बहिणीने शनिवारी आरोपी पित्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पीडिता रात्री झोपेत असताना आरोपी पित्याने दोन तीन वेळा तिच्या छातीला स्पर्श केला. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने अनेकदा तिच्यावर अत्याचार केले.

पीडिताच्या फिर्यादीवरून पोलिसानी आरोपी पित्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात पोस्को कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली.

Web Title: Pat’s daughter was repeatedly raped with death threats

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here