Home अकोले अकोले: मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या; १० लाख रुपये किंमतीच्या दुचाकी...

अकोले: मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या; १० लाख रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त

Breaking News | Rajur Police Arrested Motorcycle Theft :  राजूर पोलिसांनी तब्बल १० लाख ८० हजार रु. किमतीच्या महागड्या १० मोटरसायकल जप्त केल्या.

Motorcycle theft inn accused in shackles A two-wheeler worth Rs.10 lakh seized

राजूर: महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यास राजुर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १० लाख ८० हजार रु. किमतीच्या महागड्या १० मोटरसायकल जप्त केल्या. याबाबत राजुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजुर शेंडी आणि अन्य ठिकाणच्या मोटरसायकली या चोरीला गेलेल्या असताना या पार्श्वभूमीवर राजूर आणि शेंडी गावातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला.

पोलीस स्टाफसह इगतपुरी येथे तपासणीसाठी गेले. त्या गुन्ह्यातील संशयित शंकर एकनाथ गांगड राहणार उबाडे, तालुका इगतपुरी याला ताब्यात घेऊन त्यास पोलिसांच्या खाक्या दाखवल्यानंतर त्याने राजुर शेंडी येथील दोन बुलेट त्याच्या साथीदारासोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून सदर गुन्ह्यातील दोन्ही बुलेट मोटरसायकल सदर आरोपींकडून जप्त करण्यात आल्या.

तसेच आरोपीस विश्वासात घेतले असता त्याच्याकडे इतर मोटर सायकलबाबत चौकशी केली असता त्याने इतर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटर सायकल चोरी केले बाबतची माहिती दिली. त्यावरून त्यांच्याकडून १० मोटरसायकली असा एकूण १० लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीने राजुर पोलीस स्टेशन शहापूर पोलीस स्टेशन ग्रामीण अंबड पोलीस स्टेशन नाशिक अशा पोलीस स्टेशनमधून या गाड्या चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Web Title: Motorcycle theft inn accused in shackles A two-wheeler worth Rs.10 lakh seized

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here