Home नागपूर धक्कादायक ! इन्स्टाग्रामवर ओळख अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्कादायक ! इन्स्टाग्रामवर ओळख अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Breaking News | Crime: मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाच्या आणाभाका झाला. दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित, गर्भवती असल्याने नातेवाईक यांना धक्का. बलात्कारासह  (Rape) विविध कलमान्वये गुन्हा दाखल.

Identity on Instagram and abuse of a minor girl

नागपूर: अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकाला पारडी पोलिसांनी अटक केली. शिवम शेषराम मेहरा (वय १९, रा. एकतानगर, भांडेवाडी) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. ही १५वर्षीय मुलगी दहाव्या वर्गात शिकते. शिवम हा फर्निचरचे काम करतो. ऑक्टोबर २०२३मध्ये शिवमची पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मुलीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाच्या आणाभाका झाला. दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

दरम्यान, मुलीची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नातेवाइकांना धक्का बसला. नातेवाइकांनी चौकशी केली. शिवमसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तिने नातेवाइकांना सांगितले. मुलीच्या एका नातेवाइकाने पारडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शिवमला अटक केली. पोलिसांनी शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

Web Title: Identity on Instagram and abuse of a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here