Home महाराष्ट्र मुंबईच्या तिघांचा बुडून मृत्यू

मुंबईच्या तिघांचा बुडून मृत्यू

पुणे : जाधववाडी (ता. मावळ) येथील धरण परिसरात सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तिघांचा रविवारी दुपारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या वेळी बुडणाऱ्या इतर दोघांना वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले.

अनिल कोंडीबा कोळसे (५८,रा. घाटकोपर,मुंबई), प्रीतेश रघुनाथ आगळे (३२) प्रशील आढाव (८, रा.वाशी, नवी मुंबई) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर दादासाहेब गायकवाड (४३,रा. येलवाडी,ता. खेड) यांच्यासह एक जन एनडीआरएफच्या मदतीमुळे बचावले आहेत. मृत व्यक्ती  दादासाहेब गायकवाड यांचे नातेवाईक असून, ते उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्तत्यांचाकडे आले होते. गायकवाड यांच्या सोबत त्याच्या पत्नी संगीता गायकवाड, मुलगी उत्कर्षा गायकवाड, बहिण छाया कोळसे, तिचे पती अनिल कोळसे, भाची स्मिता आढाव, तिचा मुलगा प्रशील आढाव, जावई रितेश आगळे असे सर्व जण मारुती अल्टो कार आणि रिक्षामधून जाधववाडी धरणात फिरायला गेले. धरणामध्ये एनडीआरएफच्या जवानांचा कॅम्प सुरु आहे. त्यामुळे सर्व जण कॅम्पपासून थोड्या अंतरावर पाण्यामध्ये खेळण्यासाठी व फोटो काढण्यासाठी गेले. सर्व जण धरणाच्या काठावर बसले असता अनिल कोळसे यांचा पाय घसरला आणि ते धरणात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी दादासाहेब गायकवाड यांनी हात दिला. अनिल यांना पकडत असताना धक्का लागून स्मिता आणि प्रशील हे देखील पाण्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी जावई प्रीतेश हे पाण्यात आले. मात्र, प्रीतेश कुणालाही वाचवू शकले नाही. उलट ते ही बुडू लागले. यामुळे संगीता आणि त्यांची मुलगी या दोघी सर्वाना वाचवण्यासाठी पाण्याकडे धावल्या.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या जवानांची तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्वांना पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत प्रशील, अनिल, प्रीतेश यांचा मृत्यू झाला होता.     

Website Title:  Mumbai’s three drowned after death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here