Home अहमदनगर अहमदनगर: मुन्नाभाई पोलिसांच्या जाळ्यात, रुग्णांवर बोगस उपचार

अहमदनगर: मुन्नाभाई पोलिसांच्या जाळ्यात, रुग्णांवर बोगस उपचार

Ahmednagar News:  डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई. (bogus treatment of patients)

Munnabhai in police net, bogus treatment of patients

श्रीगोंदा:  तालुक्यातील पेडगाव येथे डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोठा औषध साठा जप्त केला. ही कारवाई सोमवारी संध्याकाळी सहा वाजता पेडगावमध्ये केली.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिल्या. नितीन खामकर यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरविंदू बिश्वास (वय २८ वर्षे, रा. भांबोरा, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांना अज्ञात इसमांनी काही दिवसांपूर्वी पेडगाव येथे एक दवाखाना उघडला असून त्या डॉक्टरकडे कसल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. खामकर यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक भोसले यांनी पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग आणि त्यांच्या टीमला तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासोबत बनावट डॉक्टरवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी नसताना बनावट डॉक्टरने डॉक्टर असल्याचे भासवून अॅलोपॅथिक औषधांचा वापर केला. तसेच रुग्णांवर औषधोपचार करून रुग्णांची व शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून बनावट डॉक्टर अरोविंदू बिश्वास याला पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले.

Web Title: Munnabhai in police net, bogus treatment of patients

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here