Home अकोले अकोले: घरफोडीचा उद्देश;  मारहाणीत एक ठार, खुनाचा गुन्हा

अकोले: घरफोडीचा उद्देश;  मारहाणीत एक ठार, खुनाचा गुन्हा

Akole Murder News:  घरफोडी करण्याच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा खून (Murder) झाल्याची घटना.

purpose of the burglary One killed in beating, crime of murder

राजूर: अकोले तालुक्यातील वाकी येथे एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. घरफोडी करण्याच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीत मधुकर किसान सगभोर (वय ४१) या व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे. पत्नी जखमी झाल्या आहेत.

मयत मधुकर सगभोर हे वाकी शिवारात वस्तीवर असलेल्या आपल्या घरी पत्नी पुष्पा मधुकर सगभोर (वय ३६) व फिर्यादी मुलगी पायल मधुकर सगभोर (वय १९) असे तिघे झोपले होते. सोमवारी रात्री एकच्या सुमारास तीन अज्ञात पुरुष आपल्या तोंडाला फडके बांधून त्यांच्या घरात घुसले. यात आरोपींनी त्यांना दमदाटी करत त्यांच्या जवळ असलेल्या लाकडी काठीने मारहाण केली. यात मधुकर यांना मोठ्या प्रमाणावर मारहाण केल्यामुळे मधुकर यांचा मृत्यू झाला. घरातच झोपलेल्या त्यांच्या पत्नी पुष्पा व मुलगी यांनाही त्यांनी मारहाण केली. घडलेल्या घटनेची माहिती पोलिस पाटील यांनी गस्तीवरील पोलिसांना दिली. मंगळवारी पहाटे चार वाजता माहिती मिळताच राजूर पोलिस आहे. कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेची माहिती घेत त्यांनी जखमी पुष्पा यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर मृत मधुकर याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात आणला.

पायल सगभोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी या तीन पुरुष आरोपींविरुद्ध खून तसेच घरफोडी करण्याच्या उद्देशाने घरात घुसून खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घटनेचा तपास सपोनि इंगळे, पोलिस उपनिरीक्षक जे. एफ. शेख व पोलिस कर्मचारी करत आहेत. या घडलेल्या या घटनेमुळे वाकी परिसरात खळबळ आहे.

Web Title: purpose of the burglary One killed in beating, crime of murder

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here