डोक्यात बियरची बाटली फोडून एकाला संपवलं अन….
Nashik Crime: मुंबई व्यक्तीचा गळा चिरून, डोक्यात बियरची बाटली फोडून खून (Murder) केल्याची घटना.
नाशिक: शहराला हादरवणारी खुनाची घटना समोर आली आहे. मुंबई येथील प्रवीण मधुकर दिवेकर या व्यक्तीचा गळा चिरून, डोक्यात बियरची बाटली फोडून खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. संशयित घटनस्थळावरून मयताचा मोबाईल, वाहन घेऊन पसार झाल्याने खून का व कोणी केला याबाबत पोलीस तपास करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील प्रवीण मधुकर दिवेकर हे मागील पंधरा दिवसांपासून ते जेलरोड येथे एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांना आजूबाजूला कोणीही ओळखत नव्हते. मात्र प्रविणची मुलगी फोन करून विचारपूस करत असे. दरम्यान सोमवारी सकाळी मुंबईहून दिवेकर यांचे आई-वडील नाशिकला खरेदीसाठी आल्यावर मुलाला भेटण्यासाठी घरी आले. तेव्हा प्रवीण दिवेकर जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले.
त्यावेळी मृत दिवेकर यांच्या गळ्यावर विळीने वार करण्यात आले असून मद्याच्या बाटल्या फोडून काचांनी त्यांच्या शरीरावर वार करण्यात आलेले होते. सदरची घटना सोमवारी पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. तर, रविवारी रात्री प्रवीण दिवेकर यांनी कुटुंबियांना फोन करून बोलल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत नमुने संकलित केले आहेत तर, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींचा शोध घेत फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सद्यस्थितीत संशयितांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून ही घटना घडली का? यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Murder by breaking a beer bottle on the head
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App