Home नाशिक सिन्नर: हॉटेलमधील वेश्याव्यवसायावर छापा, तीन महिला व तीन पुरुष ताब्यात

सिन्नर: हॉटेलमधील वेश्याव्यवसायावर छापा, तीन महिला व तीन पुरुष ताब्यात

Sinnar:  मुसळगाव येथे लहामगे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हॉटेल मनोज येथे सुरू असलेला अवैध कुंटणखान्यावर (prostitution) छापा टाकून तीन महिला व तीन पुरुषांना ताब्यात.

Raid on prostitution in the hotel, three women and three men were detained

सिन्नर: स्थानिक गुन्हे – शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने मुसळगाव येथे लहामगे कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हॉटेल मनोज येथे सुरू असलेला अवैध कुंटणखान्यावर छापा टाकून तीन महिला व तीन पुरुषांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुसळगाव परिसरात अवैध कुंटणखाना सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या दलाला मिळाली होती. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वी कारवाई केली आहे.

पोलीस पथकातील सेवकांनी व अधिकाऱ्यांनी साध्या वेशात रविवारी (दि. २८) लहामगे कॉम्प्लेक्स च्या परिसरात दाखल झाले. सहाय्यक निरीक्षक गीते यांनी वरच्या मजल्यावर खोलीत दडून बसलेल्या लहामगे यास दरवाजा उघडण्यास भाग पाडले. यावेळी खोलीत तीन महिला व तीन पुरुष ग्राहकांसोबत आढळून आल्या. हॉटेल मालक लहामगे याच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खोलीतून सुमारे दोन हजार रुपयांची रोख रक्कम, नऊ मोबाईल फोन, निरोध पाकिटांचा बॉक्स, सिगरेटची पाकिटे, महिलांची ओळखपत्रे जप्त करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या महिला व पुरुष संशयीतांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

Web Title: Raid on prostitution in the hotel, three women and three men were detained

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here