इगतपुरी हादरली! मुलीचा प्रेमविवाह, आई-वडिलांची ट्रेनखाली आत्महत्या
Nashik Suicide: एका दाम्पत्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या (Suicide).
नाशिक: धक्कादायक बातमी नाशिकमधून..मुलीने प्रेम विवाह केला म्हणून आई वडिलांनी आत्महत्या केलीय. इगतपुरी तालुक्यात ही घटना घडलीय. मुलीने प्रेम विवाह केल्यामुळे निवृत्ती खातळे आणि त्यांची पत्नी मंजुळा खातळे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीनं प्रेमविवाह केल्यानं समाजात तोंड कसं दाखवायचं, या विचारांनी त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी दोन्हीही मृतदेह त्यांच्या जावयाच्य घरासमोरच जाळून अंत्यसंस्कार केले.
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने (Crime in Maharashtra)- वाढ होत आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात मोठी घटना घडली. यामध्ये एका दाम्पत्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले.
नाशिक जिल्ह्यात मोठी घटना घडली. यामध्ये एका दाम्पत्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. या दाम्पत्याच्या मुलीचे एका तरुणाने डोळ्यांदेखत अपहरण केले होते. पण त्यानंतर झालेल्या अपमानाने या दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
नाशिक जिल्ह्यातील विंचूरदळवी येथून भरवीरकडे जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला दुचाकीवर बसवून कथित प्रियकराने साथीदारांच्या मदतीने पळवले. आपल्या डोळ्यांदेखत मुलीला पळवल्याने या दाम्पत्याला मोठा धक्का बसला. त्यामुळे बदनामी होण्याच्या भीतीने भरवीर बुद्रुक (ता. इगतपुरी) येथील मंजुळा निवृत्ती खातळे (40), निवृत्ती किसन खातळे (47) या दाम्पत्याने रविवारी सायंकाळी रेल्वेखाली आत्महत्या केली.
Web Title: Girl’s love marriage, parents’ suicide under the train
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App