Home संगमनेर जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमण अखेर जमीनदोस्त, 16 आरोपी अटकेत

जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमण अखेर जमीनदोस्त, 16 आरोपी अटकेत

Sangamner News: हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून याच जोर्वे नाका परिसरात मोठी हाणामारी झाली होती. याप्रकरणी 16 आरोपींना अटक (Arrested).

Encroachment in Jorve Naka area is finally cleared, 16 accused arrested

संगमनेर:  गेल्या काही वर्षांपासून अनेक नागरिकांची डोकेदुखी ठरलेले शहरातील जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमण अखेर काल सकाळी प्रचंड पोलीस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले. हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून याच जोर्वे नाका परिसरात मोठी हाणामारी झाली होती. याप्रकरणी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जोर्वे नाका येथे पोलीस चौकी सुरू होणार आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे.

जोर्वे नाका परिसरात टपरी धारकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते. यामुळे या ठिकाणी वाहतुकीची नेहमी कोंडी व्हायची. यातून अनेकदा वाद झाले होते. या रस्त्यावरून जोर्वे, रहिमपूर, कोल्हेवाडी व इतर गावांतील नागरिक दररोज संगमनेरला ये-जा करतात. स्थानिक दुकानदार व या गावातील ग्रामस्थ यांच्यात अनेकदा भांडणे झालेली आहेत. दोन दिवसांपूर्वी हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून याच जोर्वे नाका परिसरात मोठी हाणामारी झाली होती. या हाणामारीत धारदार शस्त्राचा वापर झाल्याने जोर्वे येथील आठ तरुण गंभीर जखमी झाले होते. यामुळे जोर्वे येथील नागरिक संतप्त झाले होते. जोर्वे नाका परिसरातील सर्व अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली होती. यासाठी ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. या हाणामारीमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलेले आहे. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे.

जोर्वे नाका परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी ही ग्रामस्थांनी केली होती. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत संगमनेर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात सकाळी साडेआठ वाजल्यापासून पुणे रस्त्यापासून जोर्वेच्या दिशेला असलेली सुमारे पंधराहून अधिक दुकाने हटविली. सुरुवातीला अतिक्रमण धारकांच्या समर्थकांनी या कारवाईला विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड पोलीस बंदोबस्तासमोर तो नगण्य ठरला.

अतिक्रमण हटाव पथकाने पुणे रस्त्यापासून जोर्वेकडे जाणार्‍या रस्त्यावरील पंधराहून अधिक अतिक्रमणे भुईसपाट केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका निरीक्षक देवीदास दुमणे यांच्यासह शहर व तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व धडक कृती दलाच्या जवानांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Encroachment in Jorve Naka area is finally cleared, 16 accused arrested

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here