Home क्राईम अहमदनगर: महिला मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर: महिला मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Ahmednagar News: जमिनीची नोंद करण्यासाठी मध्यस्थाच्या मदतीने २ हजार रुपयांची लाच (Bribe).

Women Mandal Adhikari in the net of bribe

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर बुद्रुक  येथील अलीकडेच मंडलाधिकारी या पदावर रुजू झालेल्या महिला अधिकार्‍यांला नगर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन हजार रुपयांची लाच  घेताना रंगेहाथ पकडले आहे.

बेलापूर येथील मंडलाधिकारी सारिका भास्कर वांढेकर ( वय ४१ ) यांनी जमिनीची नोंद करण्यासाठी मध्यस्थाच्या मदतीने २ हजार रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंडलाधिकारी वांढेकर तसेच त्यांच्या मध्यस्थाला ताब्यात घेतले. त्यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यस्थाचे नाव बाबासाहेब बाबुराव कदम (वय ५२, राजुरी, ता. राहाता) असे आहे.

लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी ही कारवाई केली. कारवाईत २ हजार रुपये मिळून आले.

श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर येथील एका तक्रारदाराने याप्रकरणी तक्रार केली होती. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीची फेरफारवर नोंदणी करावयाची होती. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी बेलापूर येथील मंडलाधिकारी कार्यालयात लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता.

मध्यस्थ बाबासाहेब कदम याने तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पडताळणी दरम्यान मंडलाधिकारी वांढेकर यांनी कदम यांना लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याचे समोर आले.

Web Title: Women Mandal Adhikari in the net of bribe

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here