Home क्राईम अनैतिक संबंधातून ग्रामपंचायत संगणक चालकाच्या डोक्यात दगड मारून खून

अनैतिक संबंधातून ग्रामपंचायत संगणक चालकाच्या डोक्यात दगड मारून खून

Murder by throwing stones at the head of a Gram Panchayat computer operator due to immoral relationship

हिंगोली : हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी बहिनाराव ग्रामपंचायतीमध्ये अनैतिक संबंधातून खून (Murder by throwing stones at the head of a Gram Panchayat computer operator due to immoral relationship) केल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे. कार्यरत संगणक चालकाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामधील आरोपी पळून जात असताना मनमाड येथून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी तीनही  आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सावळी बहीनाराव येथील सचिन धुळबा धवसे ( वय ३० ) हे मागील दहा वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणक चालक म्हणून कार्यरत होते. २३ जानेवारी रोजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात रात्री हिराने सचिनचा डोक्यात दगड मारून खून केल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले. ही घटना सकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करून या खून तपासाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पोलिसानी गावातून माहिती घेतली असता गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले. यासंदर्भात वारंवार सांगूनही सचिन ऐकत नसल्याने, खून करण्यास सहकार्य करणाऱ्या पंडित पोले यांनी ही माहिती दिली. तसेच सचिनचा खून करून ते दोघे परभणी मार्गे पळून गेले असल्याचे सांगितले. पोलिसांनी हायटेक यंत्राच्या सहाय्याने मोबाईल लोकेशनवरून या खुनातील मुख्य आरोपी विश्वनाथ धवसे हे छोट्या मुलासोबत मनमाड येथून पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.

Web Title: Murder by throwing stones at the head of a Gram Panchayat computer operator due to immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here